May 23, 2022

…म्हणून चंदनाच्या झाडा भोवती सापांचे वास्तव्य असते

पृथ्वीतलावर मनुष्य जीवजंतू याप्रमाणेच वनस्पती ,वेली ,वृक्ष यांचे सुद्धा वास्तव्य आहे. वनस्पती ,वेली ,वृक्ष यांचे एक वेगळेच जग असते .प्रत्येक वृक्ष आणि वनस्पतीचे निराळे गुणधर्म असतात. या गुणधर्मां ना लक्षात घेऊन मनुष्य आणि वन्य जीवां प्रमाणेच जीवजंतू सुद्धा या वनस्पती आणि वृक्षांचा वापर करून घेत असतात. म्हणूनच संत तुकाराम महाराजांच्या महान अभंगांमध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती अशाप्रकारची वर्णन आढळून येतात. जसे की सांगितले आहे प्रत्येक वृक्ष आणि वनस्पतीचे निरनिराळे गुणधर्म असतात त्याच गुणधर्मानुसार विविध जीवजंतू व जीव वृक्षाकडे आकर्षित होतात .

Loading...

अशीच काही वर्णने सांगतात की आपल्या थंडपणा, शीतलता ,दाह कमी करण्याची प्रवृत्ती यामुळे प्रसिद्ध असलेल्या चंदनाच्या झाडाभोवती सापांचे अस्तित्व असते. चंदनाच्या झाडांभोवती सापांचे अस्तित्व खरंच असते का  या संदर्भात काही तथ्य आज आपण जाणून घेणार आहोत.

Loading...

 साप हा जीव आपल्या शरीरातील तापमान स्वतःहून नियंत्रित करण्याची क्षमता बाळगून नाही.म्हणजेच जसे थंड हवेमुळे किंवा  थंड तापमानामध्ये अन्य वन्यजीव शरिरातील तापमानाला उबदार बनवू शकतात किंवा गरम तापमानामध्ये गेल्यानंतर शरीरातील आवश्यक तापमानानुसार थंडपणा नियंत्रण ठेवू शकतात ती क्षमता सापांमध्ये नसते.अशा प्रकारे स्वतःच्या शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची क्षमता शरीरामध्ये नसलेल्या जीवांना बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी जेव्हा अति थंडपणा असतो तेव्हा गरम ठिकाणी जावे लागते तर जेव्हा अति उष्णता असते तेव्हा अति थंडीच्या ठिकाणी त्यांना आश्रय घ्यावा लागतो.

Loading...

ताप ,पाल, बेडूक ,अनेक प्रकारचे पतंग, मासे ,मगर यांसारख्या प्राण्यांमध्ये सुद्धा स्वतःच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता नसते .त्यामुळे त्यांना सुद्धा बाहेरील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी ठराविक तापमान असलेल्या जागेचा आश्रय घ्यावा लागतो.

Loading...

चंदनाचे झाड आपल्या शीतलता आणि दाह कमी करण्याच्या प्रवृत्तीमुळे ओळखले जाते. चंदना मध्ये काही रसायनांमुळे एक प्रकारची थंडावा देण्याची प्रवृत्ती असते व चंदनाच्या झाडाला एक वेगळाच सुगंध ही येत असतो.

Loading...

सापांना आपल्या शरीराचे तापमान उष्ण तापमानामध्ये नियंत्रित करण्यासाठी जमिनीच्या खाली एखाद्या थंड जागेचा आश्रय घ्यावा लागतो किंवा शीतल प्रवृत्ती असलेल्या चंदनाच्या झाडाचा ते आश्रय घेतात. चंदनाच्या झाडावर सापाप्रमाणेच जे अन्य जीवजंतू आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकत नाही तेसुद्धा आश्रय घेतात. त्यामुळे याठिकाणी सापाला भक्ष्य सुद्धा मिळते म्हणून बहुतांश वेळी चंदनाच्या झाडाभोवती सापांचे वास्तव्य असल्याचे दिसून येते.

Loading...

जे जीवजंतू किंवा जीव आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकत नाही त्यांची घाणेंद्रिये ही अत्यंत तीक्ष्ण असतात असे मानले जाते. त्यामुळेच चंदन, रजनीगंधा यांसारख्या तीव्र सुगंध असलेल्या वनस्पतींची कडे ते जास्त प्रमाणात आकृष्ट होतात असे सुद्धा काही संशोधनांमध्ये आढळून आले आहे.

Loading...