May 23, 2022

चंदनाच्या शेतीतून कमवा करोडोरुपये. जाणून घ्या चंदनाची शेती कशी केली जाते

विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही प्रकारच्या अर्थव्यवस्थांमध्ये बेरोजगारीची समस्या निर्माण होऊ शकते.ज्या देशांमध्ये अतिरिक्त लोकसंख्ये चे प्रमाण अधिक असते अशा देशांना लोकसंख्येच्या मानाने रोजगाराच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यामुळे बेरोजगारीचे संकट नेहमीच भेडसावत असते. उदरनिर्वाहाचे साधन मिळवण्यासाठी अशा देशांमध्ये बहुतांश तरुण हे उद्योग व्यवसायाकडे वळतात .बऱ्याचदा उद्योग व्यवसायाची निवड करताना  कमी खर्च, कमी श्रम, कमी गुंतवणूक व ताबडतोब नफा मिळू शकेल अशा व्यवसायाची निवड करण्यास प्राधान्य दिले जाते .भारत हा कृषिप्रधान देश मानला जातो.

Loading...

फार पूर्वीपासून उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेतीला प्राधान्य दिले जात होते .मात्र सध्या आसमानी व सुलतानी संकटांमुळे शेतीकडे केवळ कर्जबाजारी होण्याचे साधन म्हणून बघण्याचा दृष्टीकोण सध्याच्या घडीला तरुणांमध्ये निर्माण होत आहे .यालासुद्धा काही अपवाद आहेत.योग्य ती गुंतवणूक व शेतीची पद्धती निवडली तर काही पिकांच्या उत्पादनापासून निश्चितच बेरोजगारीची समस्या टाळण्या सोबतच अमाप नफाही मिळू शकतो.आधुनिक शेतीमध्ये काही पिकांचे उत्पादन हे दीर्घ मदतीचे गुंतवणूक म्हणून घेतले जाते .असेच एक कृषी उत्पादन म्हणजे चंदनाच्या झाडांची शेती होय.चंदनाच्या झाडांचे उत्पादन कसे घ्यावे याबद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

Loading...

चंदनाची शेती ही एक दीर्घ मुदतीची गुंतवणूक असते. चंदनाच्या शेतीमधील उत्पादन दीर्घ मुदतीचे असून कमी खर्चात मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो.चंदनाची शेती करण्यासाठी नर्सरी मधून चंदनाची रोपे आणून ती लावली जाऊ शकतात किंवा चंदनाच्या बिया सुद्धा काही ठिकाणी मिळतात त्यांची लागवडही केली जाऊ शकते.

Loading...

चंदनाची शेती ही लाल जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे केली जाऊ शकते. मुरमाड जमिनीमध्ये किंवा खडकाळ जमिनीमध्ये ही चंदनाची रोपे तग धरू शकतात.मात्र क्षारयुक्त जमीन व ओलसर जमिनीमध्ये चंदनाची रोपे झपाट्याने वाढत नाहीत.

Loading...

एप्रिल ते मे महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे चंदनाच्या झाडांची लागवड करण्यासाठी जमिनीची मशागत केली जाते. दोन रोपां मध्ये साधारण 30 ते 40 सेंटिमीटर चे अंतर राहील अशा प्रकारे जमिनीची दोन ते तीन वेळा नांगरणी केली जाते.

Loading...

मान्सून मध्ये चंदनाच्या शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळून योग्य ती वाढ होते मात्र उन्हाळ्यात विशेष करुन सिंचनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.चंदनाच्या शेतीसाठीही ठिबक सिंचनाचा पर्याय मोठ्या प्रमाणात वापरला जातो .मात्र पाणी झिरपण्याची मात्रा व जमिनीचा पोत यानुसार ही सिंचनाचा प्रकार निश्चित केला जातो.

Loading...

चंदनाची झाडे 5 ते 5० डिग्री सेल्सियस इतक्या तापमानामध्ये लावली जाऊ शकतात .चंदनाच्या शेतीसाठी सात ते आठ पी एच फॅक्टर असलेली जमीन निवडली जाते. एक एकर जमिनीवर सर्वसाधारणपणे 400 चंदनाची झाडे लावली जाऊ शकतात.

Loading...

चंदनाच्या झाडा साठी वापरले जाणारे एक रोप हे साधारणपणे चाळीस ते पन्नास रुपये इतक्या किमतीचे असते. याव्यतिरिक्त चंदनाच्या झाडांसाठी वापरले जाणारे खत हे प्रतिवर्षी साधारण चाळीस ते पन्नास हजार  इतक्या मूल्याचे असते .चंदनाच्या शेतीच्या सुरक्षेसाठी रखवालदाराची नेमणूक करणे आवश्यक असते .त्याचप्रमाणे चंदनाच्या झाडांच्या सुरक्षेची हमी म्हणून त्यांचा विमा सुद्धा उतरवला जातो.

Loading...

चंदनाच्या झाडाचे लाकूड हे विकण्यासाठी साधारण बारा ते पंधरा वर्षांचे झाल्यावर पूर्णपणे तयार होते.लागवडीपासून पाच वर्षानंतर चंदनाचे लाकूड रसदार बनायला सुरुवात होते. एका चंदनाच्या झाडापासून किमान 40 किलो इतके लाकूड मिळू शकते. चंदनाच्या लाकडाची प्रति किलो किंमत सहा ते दहा हजार इतकी असते.

Loading...

चंदनाच्या झाडाच्या मुळापासून निरनिराळ्या सुगंधित उत्पादनांची निर्मिती केली जाते म्हणून चंदनाचे झाड मुळापासून कापले जाते व त्यानंतर त्याचे लाकडाच्या छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये विभाजन केले जाते.

Loading...

चंदनाच्या लाकडाला सौंदर्य आणि आरोग्य क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. चंदनाच्या लाकडापासून निर्माण केलेल्या तेल आणि अन्य सौंदर्यप्रसाधनांमुळे त्वचेवरील पुरळ ,अँलर्जी सारख्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात.चंदनाच्या तेलाने मालिश केल्यामुळे केस गळण्या सारख्या समस्यांपासून सुटका मिळते व नवीन केस उगवण्यासाठी साहाय्य मिळते असे काही संशोधनामध्ये आढळून आले आहे .अतिरिक्त ताण तणाव ,रक्तदाबाच्या समस्यांशी निगडीत काही औषधांमध्ये ही चंदनाचा प्रयोग संशोधक सध्या करत आहेत यामुळे भविष्यात चंदनाच्या लाकडांना मागणी वाढू शकते.