July 5, 2022

पोटाचा घेर कमी करायचाय ? मंग करा हे घरगुती 10 उपाय

आकर्षक शरीरयष्टी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते.सध्याच्या धावपळीच्या जीवनात बदललेली जीवनशैली, आहार यामुळे फिट अँड फाइन हा फंडा अमलात आणण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्नशील असते हे दिसून येते. सडपातळ शरीर मिळवण्यासाठी काही व्यक्ती जिम, एरोबिक्स ,योगासने यांसारख्या व्यायाम प्रकारांचा अवलंब करतात तर काही केटो डायट,प्रोटीन डाएट यांसारख्या डाएटसला फॉलो करताना दिसून येतात.हे सर्व व्यायाम प्रकार आणि डाएट वजन कमी करण्यामध्ये कितपत प्रभावी आहेत हे त्यांना सातत्याने अमलात आणण्यावरच अवलंबून असते. आकर्षक शरीरयष्टी ही व्यक्तीच्या पोटाच्या घेरावरही अवलंबून असते. बेढब, सुटलेले पोट हे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला आकर्षक दिसण्यामध्ये बाधा आणते.पोटाचा घेर वाढल्यामुळे शरीराच्या हालचालीवरही निर्बंध येतात .म्हणूनच आज पोटाचा घेर कमी करण्यासाठी कोणते प्रभावी उपाय आपण योजू शकतो हे जाणून घेणार आहोतः

Loading...

1) विघटन होऊ शकणाऱ्या  तंतुमय पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवावे. विघटन होऊ शकणार्‍या तंतुमय पदार्थांमुळे पोट भरल्या सारखे वाटते व त्यामुळे आपोआपच अतिरिक्त खाण्याचे प्रमाण कमी होते. तंतुमय पदार्थांमध्ये मोड आलेली कडधान्य,ओटस इत्यादींचा समावेश होतो.

Loading...

2) ट्रान्स फँटचा वापर असलेल्या ,कृत्रिम रित्या बनवलेल्या हवाबंद पदार्थांचा आहारातील वापर शक्यतो टाळावा. ट्रान्सफँट असलेल्या पॅकेज फूड मुळे हृदयाचे रोग, ऍसिडिटी व पोटाचे वजन वाढण्यासारखे प्रश्न जास्त प्रमाणात निर्माण होत असल्याचे दिसून येते.

Loading...

3) दैनंदिन आयुष्यातील अल्कोहोलचे प्रमाण कमी करावे. अल्कोहोलच्या अतिरिक्त सेवनामुळे कंबर व पोटाचा घेर वाढतो असे आढळून आले आहे.

Loading...

4) आहारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिन पदार्थांचा समावेश करावा. प्रथिने ही शरीराच्या त्वचा, केस नखे इत्यादींच्या आरोग्यासाठी उपयुक्त तर असतातच मात्र त्यामुळे खूप लवकर भूक लागत नाही व मधल्या वेळात खाण्याचे प्रमाण कमी होते .अंडी ,चिकन ,कडधान्य ही प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे.

Loading...

5) अतिरिक्त तणावामुळे व्यक्तीच्या शरीरातील कॉर्टीसाँल हे हार्मोन मोठ्या प्रमाणात वाढते व त्यामुळे कमरेजवळचे वजन वाढते असे दिसून येते. तणावामुळे काँर्टीसोल तयार होण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते म्हणूनच तणावाला दूर ठेवणे हे पोटाचे वजन कमी करण्यासाठी आवश्यक मानले जाते.यासाठी त्यांनी तणावाला दूर ठेवून आनंददायी कामे करण्यावर भर द्यावा. योगा ,ध्यानधारणा इत्यादींमुळे तणाव दूर ठेवता येऊ शकतो.

Loading...

6) गोड पदार्थांचे सेवन शक्यतो टाळावे .गोड पदार्थांमध्ये फ्रुक्टोज असतं यामुळे पोटाजवळचे वजन वाढण्यास चालना मिळते.अतिरिक्त गोड खाण्यामुळे वजन वाढण्यासोबतच फँटी लिव्हर,टाईप टू डायबिटीस यांसारख्या आजारांना निमंत्रण मिळते.

Loading...

7) एरोबिक्स मुळे स्त्रियांमध्ये पोटाजवळील वजन कमी होण्यास लवकर साहाय्य होते.

Loading...

8) आहारामध्ये नारळ तेलाचा वापर केल्यास ते पोटाचे वजन कमी करण्यासाठी सहाय्यभूत ठरते असे काही निरीक्षणामध्ये आढळून आले आहे.नारळाच्या तेलामध्ये कॅलरी बर्न करण्याची क्षमता जास्त असते असे मानले जाते.

Loading...

9) कोल्ड्रिंक्स किंवा.चहा यांचा यांचे सेवन कमी प्रमाणात करावे. याला पर्याय म्हणून नैसर्गिक नारळ पाणी ,ग्रीन टी इत्यादींचा समावेश करावा.

Loading...

10) रोज रात्री किमान सात तास झोप घेणे हे वजन कमी करण्यासाठी आणि एकंदरीतच आरोग्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. ज्या व्यक्ती सात तासांपेक्षा कमी दररोज झोपतात त्यांची वजन वाढण्याची प्रवृत्ती जास्त असते म्हणूनच जर आपल्याला पुरेशी झोप घेण्यामध्ये काही आरोग्याच्या तक्रारी जाणवत असतील तर आपल्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला वेळीच घ्यावा.