May 23, 2022

हातावरील कोणती रेषा काय सांगते? जाणून घ्या हस्तरेषाशास्त्र मधील काही प्राथमिक गोष्टी

भारतीय इतिहासाने जगाला दिलेल्या अनेक देणग्यांपैकी एक म्हणजे ज्योतिष शास्त्र आहे. ज्योतिष शास्त्र हे कितपत सत्य असते किंवा ज्योतिषशास्त्रा मधून केल्या जाणाऱ्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य असते हे जरी वादातीत असले तरीही आजही निरनिराळ्या प्रकारच्या ज्योतिष शास्त्रांचा अभ्यास अनेक ज्योतिष शास्त्रज्ञांकडून केला जातो व आपल्या समस्यांचे निराकरण किंवा भविष्याविषयी चा आढावा घेण्यासाठी अनेक लोक ज्योतिष शास्त्राचा आधारही घेताना दिसतात .ज्योतिषशास्त्र मांडण्याचे किंवा एखाद्याच्या भविष्याचे आकलन करण्यासाठी निरनिराळ्या पद्धतींनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला जातो.

Loading...

यापैकी मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे हस्तरेखा शास्त्र होय. हस्तरेषाशास्त्र हे फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे याचा उगम नक्की कुठे झाला हे स्थान माहिती नसले तरीही हस्तरेषाशास्त्र हे प्राचीन भारतातच उदयास आले असे काही संदर्भात मधून स्पष्ट होते. हस्तरेषाशास्त्र हे व्यक्तीचे व्यक्तीमत्व किंवा त्याच्या भविष्याविषयी काही भाकीत करण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाते. हस्तरेषाशास्त्र हा अभ्यास करताना काही प्रमुख व प्राथमिक गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.हस्तरेषाशास्त्र नक्की कसे तपासले जाते हे या प्राथमिक गोष्टींच्या आधारे आपण जाणून घेऊया.

Loading...

हस्तरेषा शास्त्राचा अभ्यास करताना सर्वात प्रथम कोणत्या हाताच्या रेषांचा अभ्यास करावा हे जाणून घेणे महत्वाचे आहे.उजवा व डावा या दोन्ही हातां पैकी एक हात हा जास्त प्रभावशाली असतो असं हस्तरेषाशास्त्र मध्ये मानले जाते म्हणजे दोन्ही हातांचा चा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे .मात्र उजव्या आणि डाव्या पैकी जो हात प्रभावशाली असतो त्याच्या द्वारे व्यक्तीचे कर्तृत्व भविष्यामध्ये योग्य ती वेळ आल्यावर कशाप्रकारे झळाळून निघेल हे जाणून घेता येते. तर दुसऱ्या हाता द्वारे त्या व्यक्तीच्या अंगी असलेले गुण व त्याचे व्यक्तिमत्व तपासता येते .काही पद्धतींमध्ये डावा हात व्यक्तीच्या भविष्यातील कर्तृत्वाविषयी जाणून घेण्याचे कार्य करतो असे मानले जाते.

Loading...

हातावरील रेषांचे अवलोकन करण्या यासाठी पंजाची ची ठेवण, पंजाचा आकार ,,बोटांची लांबी, बोटांची ठेवण, अंगठ्याची ठेवण ,अंगठ्याची लांबी,बोटांच्या मधील भाग ,हातांचा रंग इत्यादी सर्वसाधारण घटक तपासले जातात. पंजा व त्याची ठेवण, आकार, बोटांची लांबी इत्यादींच्या आधारे व्यक्तीच्या हाताचा प्रकार निश्चित केला जाऊ शकतो.व्यक्तीच्या हस्तरेषांचे जल ,वायु ,अग्नि व भूमी या तत्त्वांच्या आधारे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते. या चार प्रकारांच्या आधारावर व्यक्तीच्या स्वभाव व भविष्याविषयी काही आराखडे बांधले जाऊ शकतात. भूमि तत्त्व असलेल्या हातांचे पंजे हे मुख्यत्वे चौकोनाकृती असतात व बोटांची लांबी ही आखूड असते. भूमी तत्त्व असलेल्या हातांचे पंजे हे मुख्यत्वे गुबगुबीत असतात.भूमि तत्त्व असलेल्या पंजांच्या व्यक्ती या अतिशय वास्तववादी, भरवशाच्या व आपल्या कामाप्रती अत्यंत काटेकोर वृत्ती असलेल्या असतात.

Loading...

भूमि तत्त्व असलेल्या हातांच्या व्यक्ती या कोणतेही सत्य अगदी सहज पणे स्वीकारू शकतात. अग्नी तत्व असलेल्या हातांचे पंजे हे लांब असतात व व बोटे त्यामानाने आखूड असतात. अग्नी तत्व असलेल्या हस्तरेषांच्या व्यक्ती या आत्मविश्वासाने भारलेल्या व महत्वकांक्षी असतात. मात्र या व्यक्तींमध्ये दुसऱ्या प्रतीच्या सहानुभूतीची कमतरता असते.वायू तत्व असलेल्या हस्तरेषा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्तींचे पंजे हे चौकोनाकृती व बोटे ही लांब असतात .बोटांवरील हाडे सहजगत्या दृष्टीस पडतात.

Loading...

वायुतत्वाची व्यक्ती या बौद्धिक दृष्ट्या नेहमीच कुतुहूल बाळगणाऱ्या असतात व त्यांच्या मधील विश्लेषण क्षमता ही कमालीची असते. विश्लेषणाच्या बाबतीत जेव्हा त्यांना योग्य ते प्रोत्साहन मिळत नाही तेव्हा या व्यक्ती चिंताग्रस्त होऊ शकतात.जलतत्व असलेल्या व्यक्तींचे पंजे आणि बोटे ही दोन्ही लांब असतात. जलतत्व असलेल्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती कलासक्त असतात आपल्या भावना इच्छा या त्यांच्या नियंत्रणात असतात .अशा व्यक्ती या अति संवेदनशील असू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींना दुखावणे खूप सहज शक्य होते. भावनिक दृष्ट्या दुखावले गेल्यामुळे या व्यक्ती बऱ्याचदा आंतरिक तणावाला बळी पडतात.

Loading...

हस्तरेषा शास्त्र मध्ये पंजा वरील चढ आणि उतार यांचाही अभ्यास केला जातो. पंजावरील चढ आणि उतारांचा अभ्यास हा त्यांच्या नैसर्गिक ठेवणीचा भाग असतो .याच ठेवणीला पर्वत आणि पठारे असेही मानले जाते. पंजावरील फुगीर भाग व पठारांसारखा भाग हे आयुष्यातील निरनिराळ्या टप्प्यांविषयी सांगत असतात। हाताच्या पंजावरील पर्वत किंवा उभार हे सूर्य ,मंगळ, राहू, केतू ,शनी ,बुध ,गुरु आणि चंद्र या द्वारे मांडले जातात.

Loading...

हस्तरेषाशास्त्र मध्ये जो प्रमुख घटक अभ्यासला जातो तो म्हणजे हातांवरील रेषा होय.दोन्ही  हातांवरील रेषा या भिन्न असू शकतात. त्यामुळे त्यांचा बारकाईने अभ्यास करणे व तो कोणत्या संदर्भाच्या बाबतीत केला जात आहे हे लक्षात ठेवणे एका हस्तरेषाशास्त्रज्ञासाठी निश्चितच आवश्यक ठरते. हस्त रेषांमध्ये जीवन रेषा, भाग्य रेखा, हृदय रेखा, मणीबंध रेखा ,विद्या रेखा , शुक्र रेखा ,व्यापारी रेखा, मस्तिष्क रेखा, सूर्य रेखा या प्रमुख रेषांचा अभ्यास केला जातो. हाताच्या पंजावर निरनिराळ्या रेषांचा अर्थ हा त्या रेषांची लांबी, रुंदी ,आणि वर्णनानुसार लावला जातो. जसे  हृदय रेषेने व्यक्तीच्या आयुष्यातील प्रेमसंबंध ,लग्न इत्यादींबद्दल भाषण करू शकते.

Loading...

हस्तरेषाशास्त्रामध्ये पंजावरील रेषां व्यतिरिक्त त्रिकोन, शंख, क्रॉस ,आयत इत्यादींसारखे चीन्हही व्यक्तीच्या हातांच्या पंजावर असू शकतात. याद्वारेही हस्तरेषाशास्त्रज्ञ काही भाकिते वर्तवतात.

Loading...