May 23, 2022

‘ या ‘ छोट्याशा गावाचे पोट भरते बॉलीवूड …! का म्हणतात या गावाला ‘ अभिनेत्यांचे ‘ गाव ? वाचा सविस्तर

भारतीय चित्रपटांमध्ये खास करून मोठया शहरांचा सिनेमॅटोग्राफीसाठी उपयोग करवून घेतला जातो . पण राजस्थान मधील हे छोटेसे गाव ज्या गावाची लोकसंख्या आहे अवघी ५० हजार , हे गाव अभिनेत्यांचे गाव म्हणून ओळखले जाते . तर याचे कारण आहे कि , या गावातील प्रत्येक घरातील एक जण हा अभिनय आणि अभिनय क्षेत्राशी जोडलेला आहे . भारतातील हे एकमेव गाव असेल कि , ज्या गावच्या नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर नाही तर शूटिंग मधून पूर्ण होतो .

Loading...

आता तुम्ही म्हणाल , कि या अवघ्या ५० हजार लोकसंख्या असलेल्या गावातील प्रत्येकाला अभिनय क्षेत्रात काम कसे मिळते . तर याचे रहस्य देखील  या गावातच आहे . राजस्थान म्हंटलं कि डोळ्यासमोर येतात ते अनेक रंग , मोठं-मोठे राजवाडे , वस्तू स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमुने , लोकांचे विशिष्ठ पेहेराव , वाळवंट , उंट आणि अस बरच काही … ! या गावात कोणताही मोठा राजवाडा जरी नसला , तरी या गावातील घरांवर असणाऱ्या विशिष्ठ कलाकृती , घरांची रचना , चित्रपटांमध्ये राजस्थानचा पारंपरिक भाग दाखवण्यासाठी पूरक असणारी जीवनशैली या आहेत या गावाच्या जमेच्या बाजू , आणि पिकत तिथेच खपत याचा कदाचित एकमेव उदाहरण म्हणजे हे गाव आहे .

Loading...

या गावाच नाव आहे मंडावा … ! नाही , अग्निपथ मधील मांडवा नाही तर हे आहे पिके मधील मंडावा … ! हो , आपण हे गाव ‘ पिके ‘ मध्ये पाहिले आहे . त्या व्यतिरिक्त बजरंगी भाईजान, कच्चे धागे, गुलामी ,दिल्ली चलो ,जब वी मेट ,लव आज कल, पहेली, ए दिल है मुश्किल ,मिर्जा, मिमी, बोले चूड़ियां, एक्शन आणि अशा बऱ्याच चित्रपटाचे शूटिंग या गावात झाले आहे .

Loading...

सिनेमॅटोग्राफर्स देखील या गावाला पसंती देतात . याचे कारण आहे घरांवर असणाऱ्या विशिष्ठ कलाकृती , घरांची रचना , चित्रपटांमध्ये राजस्थानचा पारंपरिक भाग दाखवण्यासाठी पूरक असणारी जीवनशैली आणि कमी बजेट मध्ये सुंदर भारताचा नजारा …. त्यामुळे आता राजस्थानला गेलात तर मंडवा या गावाला भेट द्यायला विसरू नका .

Loading...