July 5, 2022

जाणून घ्या औरंगाबाद शहराच्या नाम करणा मागची ऐतिहासिक पार्श्वभूमी

दख्खनच्या दऱ्याखोऱ्यात वसलेल्या मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या व महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांपैकी एक म्हणजेच औरंगाबाद शहर औरंगाबाद शहर हे औरंगाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे .औरंगाबाद  महाराष्ट्रातील चौथे सर्वाधिक शहरी लोकसंख्या असलेले शहर आहे. या निरनिराळ्या वैशिष्ट्यांनी नटलेल्या औरंगाबाद शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी व या शहराच्या नावा मागचा ऐतिहासिक संदर्भही आहे.

Loading...

इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये सातवाहनांची राजधानी असलेले पैठण आणि यादवांची राजधानी असलेले दौलताबाद किंवा देवगिरी हे सध्याच्या औरंगाबाद शहराचा भाग होते. औरंगाबाद आणि त्याच्या जवळील भागावर तेराशे आठ मध्ये दिल्लीच्या सुलतानांनी अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण करून हे प्रदेश ताब्यात घेतले .तेराशे 27 मध्ये सुलतान मोहम्मद बिन तुगलक याने दौलताबाद हा आत्ताच्या औरंगाबादचा भाग असलेल्या शहरांमध्ये मुघलांची राजधानी म्हणून घोषित केले व दिल्लीतील जनतेला दौलताबादला पूर्णपणे स्थलांतरित होण्यास सांगितले. मात्र सुलतानाने तेराशे 34 साली स्वतःच दौलताबादहून दिल्लीला पुन्हा एकदा आपली राजधानी बनवले व  स्थलांतरित झालेल्या जनतेलाही पुन्हा दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला. चौदाशे 99 साली औरंगाबाद हे निजाम शाही साम्राज्याचा भाग बनले.

Loading...

सोळाशे दहा साली दौलताबाद चे नामकरण हे खडकी असे करण्यात आले .दौलताबाद मध्ये खडकी हे शहर मलिक अंबर या निजामशाही साम्राज्यातील मुळच्या इथिओपियाच्या  असलेल्या प्रधान मंत्र्याने वसवले .मलिक अंबर हा मुळतः इथोओपिया वरून आणण्यात आलेला एक गुलाम होता मात्र नंतर आपल्या नेतृत्व गुणांच्या आधारावर तो निजामशाही मध्ये प्रधानमंत्री या पदापर्यंत पोहोचला होता. मृत्युनंतर त्याचा वारसदार असलेल्या त्याचा मुलगा फतेह खानने खडकीचे नामकरण फतेहनगर असे केले.

Loading...

1636 आली तत्कालीन मुघल व्हाईसराय असलेल्या औरंगजेबाने फतेह नगर ला मुघल साम्राज्य साठी जिंकून घेतले .१६५३ साली  बादशहा औरंगजेबाने खडकी फतेहनगर चे नामकरण औरंगाबाद असे केले आणि औरंगाबादला मुघलांसाठी दख्खनची. राजधानी बनवले.

Loading...

सतराशे चोवीस साली मुघलांचा दख्खनचा गव्हर्नर निजाम आसफ.जहा पहिला याने वेगळे राज्य स्थापन केले व हैदराबादला आपली राजधानी बनवले तोपर्यंत औरंगाबाद हैदराबादच्या अखत्यारीत  येत होते.

Loading...

अशा प्रकारे अगदी सुरुवातीपासूनच औरंगाबाद शहराचे नामकरण वेळोवेळी वेगवेगळे संदर्भ घेत करण्यात आले होते .आधुनिक काळातही औरंगाबाद शहराचे नाव बदलावे असा आग्रह निरनिराळ्या राजकीय पक्षांकडून केला जातो .बऱ्याचदा तो मुद्दा अजेंडा म्हणून ठेवला जातो .काही पक्षांकडून औरंगाबादचे नाव हे संभाजीनगर असे केले जावे असा आग्रह धरला जात आहे मात्र अजून तरी ते शक्य झाले नाही.

Loading...

औरंगाबाद शहर हे निरनिराळ्या कारणांसाठी संपूर्ण जगभरातून पर्यटकांचे लक्ष वेधून घेते .औरंगाबाद शहराचे वैशिष्ट्य हे शैक्षणिक, सामाजिक ,ऐतिहासिक ,वास्तुशास्त्र ,आर्थिक दृष्ट्या सुद्धा महत्त्वपूर्ण आहे ,औरंगाबाद जिल्हा कॉटन आणि रेशमी कॉटनच्या उत्पादनामध्ये आघाडीवर आहे. औरंगाबाद शहरामध्ये  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नामांकित शिक्षण संस्थेचे बरोबरच अनेक शिक्षण संस्था नावारूपास आलेल्या आहेत व याठिकाणी देशातील निरनिराळ्या भागांमधून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात .

Loading...

औरंगाबाद हे पर्यटकांसाठी सुद्धा एक आकर्षणाचे केंद्र आहे. औरंगाबाद च्या जवळच असलेल्या अजिंठा आणि वेरूळ मधील गुंफा ज्यांना 1983 झाली युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये स्थान मिळाले आहे ते पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात दरवर्षी पर्यटकांची गर्दी होत असते. सोळाशे 60 साली औरंगाबाद येथे  मोगल बादशहा औरंगजेब याने आपल्या पत्नी दिल राज बानू बेगम यांच्या स्मरणार्थ बांधलेले बीबी का मकबरा हेसुद्धा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. ऐतिहासिक काळामध्ये औरंगाबाद मध्ये 52 प्रवेशद्वारे होती ज्यामुळे औरंगाबादला प्रवेशद्वारांचे शहर असेही म्हटले जाते.

Loading...