July 5, 2022

मानसशास्त्रानुसार, मुलगी किंवा स्त्रीमध्ये कोणताही पुरुष किंवा मुलगा पहिल्यांदा काय पाहतो?

मेन आर फ्राँम मार्स अँड विमेन आर फ्राँम व्हिनस  असे जे म्हटले जाते ते अगदी तंतोतंत खरे आहे. शारीरिक जडणघडणीपासून ते स्वभाव इत्यादी सर्वच बाबतीत भिन्न असलेल्या स्त्री आणि पुरुष या या दोघांमध्ये आकर्षण निर्माण होण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात हे प्रश्न सामान्य माणसापासून ते निरनिराळ्या क्षेत्रातील संशोधकांनाही पडले आहेत. यादृष्टीने मानवी संरचनेचा अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्रीय संशोधनामध्ये याच्याशी निगडित काही तथ्य समोर आलेली आहे आज आपण पुरुषांना स्त्रीकडे आकर्षित करणार्या स्त्रीच्या शारीरिक जडणघडणी मधील नक्की कोणत्या बाबी आहेत हे जाणून घेणार आहोत.

Loading...

डोळे-डोळे हे जुलमी गडे असे म्हणत अनेक कवी, शायर, गीतकार यांनी आपल्या प्रेयसीच्या डोळ्यांच्या दिलखेचक, प्रेमळ ,मोहक अदांची वर्णने केली आहे .त्यामुळे अर्थातच डोळे हा कोणत्याही पुरुषाला स्त्रीकडे आकर्षित करणारा पहिला पैलू असतो. कोणत्याही भावना डोळ्यांच्या द्वारे समोरच्याच्या मनाला अगदी अलगदपणे भिडवता येऊ शकतात .त्यामुळेच आपल्या आकर्षणाला स्त्री पर्यंत पोचवण्यासाठी पुरुष तिच्या डोळ्यांकडे सर्वप्रथम नजर टाकतो.

Loading...

कंबर- भिन्नलिंगी आकर्षण हे बऱ्याचदा शारीरिक जडणघडणीतील भिन्नतेमुळे व हार्मोन्सच्या फरकामुळे निर्माण होते .पुरुष हे स्त्रियांच्या कमरेकडे आकर्षित होतात असे खूपदा दिसून येते .स्त्रियांची कमनीय कंबर हा नेहमीच एक आकर्षणाचा बिंदू ठरलेला आहे.

Loading...

ओठ- स्त्रीचे नाजुक गुलाबी ओठ हे कोणत्याही पुरुषाला भुरळ पाडणारे असतात .स्त्रीला प्रथम भेटीमध्ये बघत असताना तिच्या ओठांवर पुरुषांची नजर निश्चितच जाते म्हणूनच स्त्री सुद्धा आपल्या सौंदर्याची काळजी घेताना ओठांची काळजी घेण्याकडे बारकाईने लक्ष देते. आपल्या ओठांचे सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक अभिनेत्रींप्रमाणेच सामान्य स्त्रियाही आता प्लास्टिक सर्जरीचा आधार घेऊ लागल्या आहेत. याचे कारण आपल्या आकर्षकतेमध्ये ओठांचे महत्त्व  जास्त आहे याची जाणीव स्त्रियांना आहे.

Loading...

हास्य -एखाद्या स्त्रीचे हास्य हे मादक असते, तर एखादीचे निखळ असते ,तर एखादीच्या हास्यामध्ये कातिल अंदाज असतो अशी निरनिराळ्या प्रकारे स्त्रीच्या हास्याची व्याख्या पुरुषांकडून केली  जाते.एक मात्र खरे की कोणत्याही पुरुषाला चेहऱ्यावर बारा वाजलेल्या किंवा आठ्या घेऊन मिरवणाऱ्या स्त्री पेक्षा हसत मुखाने वावरणाऱ्या स्त्रीचे आकर्षण हे कैक पटीने जास्त असते. अशी स्त्री पहिल्याच भेटीमध्ये कोणत्याही पुरुषाचे हृद्य जिंकून घेते.

Loading...

केस- स्त्रीच्या सौंदर्याची परिभाषा ठरवताना पुरुषांनी स्त्रियांच्या लांबसडक केसांनाही महत्त्व दिल्याचे दिसून येते .बहुतांशी पुरुषांना स्त्रियांचे लांबसडक केस हे छोट्या केसांपेक्षा अधिक भावतात. स्त्रीचा लांबसडक केशसंभार हा पुरुषांना जास्त आकर्षित करतो असे एका सर्वेक्षणामध्ये पुरुषांनी दिलेल्या उत्तरांमध्ये दिसून आले.

Loading...