हे तुम्ही ऐकलंय का?
१) इंग्लिश मध्ये १ ते ९९ लिहिताना , एकही अंकाच्या spelling मध्ये A ,B ,C ,D हे चारही वर्ण येत नाहीत.
२) जगातील सगळ्यात मोठठं हिंदू मंदिर ” कंबोडिया ” येथे आहे. जे अंगकोरवाट नावाने प्रसिद्ध आहे.
३) असं म्हटलं जातं की आपल्यासारख्याच दिसणाऱ्या एकूण ६ व्यक्ती या जगात असतात. आणि आपली looklike व्यक्ती शोधायची असल्यास twinstranger.net या site ला भेट दिल्यास आपल्यासारखीच दिसणारी दुसरी व्यक्ती आपल्याला भेटू शकते. फक्त ही site , सुरक्षित नाही हे जरूर लक्षात ठेवा.
४)तुम्हाला माहिती आहे का ? या जगाला साखरेची भेट आपल्या देशाने दिली आहे?
५)जगातील पहिली सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्याचा मान वेदिक काळातील “सुश्रूत” यांना जातो.
६)आपण समुद्राजवळ उभं राहून दूर पाहिलं की क्षितिजाचं दर्शन होतं , क्षितिज म्हणजे जिथे आभाळाला धरणी मिळाल्याचा भास होतो ती जागा ! पण हा भास का व्हावा ? याला कारण आहे , पृथ्वीचा गोल आकार . आणि दर पाच किलोमीटर नंतर पृथ्वीचा आकार वक्र होत जातो आणि म्हणूनच ५ कमी नंतरचा भूभाग दिसेनासा होतो.
७) त्याचबरोबर आपण पृथ्वीवरून सूर्याच्या दिशेने गोळी झाडल्यास ती सूर्यापर्यंत पोहोचायला १० वर्षे लागतील.
८)एक ससा हा आकाराने लहान असूनही , कुत्र्यापेक्षा जास्त पाणी पितो .
९)तर डासांना जमिनीपासून फक्त ४० फूट वरपर्यंतच उडता येते .
१०) घोड्याशी निगडित अनेक कथा / दंत कथा आपण ऐकतो . त्यांची स्वामिनिष्ठा , राणी लक्ष्मीबाई , महाराणा प्रताप यांच्या घोड्यांमुळे आपल्याला इतिहासातून मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का ? घोडा कधीही बसत नाही , in fact , तो झोप देखील उभं राहून काढतो आणि केवळ मृत्यू समीप आल्यास बसलेला आढळतो .
११)तर जिराफाच्या एकंदरीत उंचीबरोबरच त्याची जीभ देखील इतकी लांब असते कि तिने तो आपला कान देखील साफ करतो. त्याच्या जिभेची लांबी “२१ इंच ” इतकी असते.
१२) तुम्हाला माहिती आहे जो चष्मा आपण वेगवेगळ्या आकारात, रंगात आणि मटेरियल मध्ये मिळतो त्याचं आपल्या पृथीवरील आयुष्य आपल्याहूनही जुनं आहे अर्थात मागील ७०० वर्षांपासून चष्मा या पृथीतलावर अस्तित्वात आहे.
१३) थोडं लेटेस्ट technology बद्दल ,एक मोबाइल फोन बनविण्यासाठी तब्बल २,५०,००० इतकी पेटंट मिळवावी लागतात.
१४) हे शेवटचं , पण सर्वात मजेशीर, तुम्हाला माहिती आहे , प्रत्येक गर्भवती स्त्रीला डॉक्टर , डिलिव्हरी date देतात त्या दिलेल्या date वर फक्त ४ % मुले जन्माला येतात . म्हणजे काही आधी जन्माला येतात तर काही नंतर !