May 23, 2022

विवाहित स्त्रियांनी पायात जोडवी का घालावी जाणून घ्या या मागचे शास्त्रीय कारण

भारतीय संस्कृतीमध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत खानपान, पेहराव इत्यादी बद्दलच्या चालीरीती ,परंपरा या धर्म ,प्रांत यानुसार बदलत असतात. बऱ्याचदा काही चालीरीती व रीतिरिवाज यांचे पालन हे मुख्यत्वे स्त्रियांनाच करावे लागते व विशेषतः विवाहित स्त्रियांना करावे लागते. हिंदू धर्मामध्ये सौभाग्यवती स्त्रीचा साजशृंगार याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या दैनंदिन आयुष्यातही सौभाग्यवती स्त्रीने टिकली, कुंकू, मंगळसूत्र ,बांगड्या, अंगठी, कानातील आभूषणे व पायात जोडवी घालणे हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते .

Loading...

आधुनिक काळामध्ये काही स्त्रीवादी व आधुनिक विचारधारा नुसार या सर्व चालीरिती जणूकाही स्त्रीला एका बंधनात जखडून ठेवण्यासारखे आहेत असे मानतात तर याउलट काही लोक याकडे केवळ एक फॅशन म्हणूनही बघतात .त्यामुळे काळाच्या ओघात पूर्वी बंधनकारक मानल्या गेलेल्या या चालीरीती सध्याच्या काळात तितक्या पाळला जात नाहीत असे दिसून येते. मात्र आपल्या पूर्वजांनी कोणतेही दंड किंवा नियम लागू करताना त्यामागे खूप विचारपूर्वक शास्त्रीय आधार घेतला असल्याचे वेळोवेळी दिसून येते .सौभाग्यवती स्त्रीने पायामध्ये जोडवी का घालावी यामागे सुद्धा एक आरोग्य आणि शास्त्रीय संदर्भांशी निगडीत चौकट आहे व ती आज आपण जाणून घेणार आहोत.

Loading...

जोडवी ही अंगठ्याच्या बाजूच्या दुसऱ्या बोटांमध्ये घातली जातात .अंगठ्या च्या बाजूला असलेल्या दुसऱ्या बोटावर प्रत्यक्ष गर्भाशयाला जोडणारी एक नस असते. जोडव्यांचा दाब या नसेवर पडून गर्भाशयाला होणारे रक्ताभिसरण सुरळीत चालते.

Loading...

विवाहित स्त्रीने अंगठ्याच्या बाजूला असलेल्या दुसर्‍या बोटावर जोडवी घातल्यामुळे गर्भाशयाला प्रत्यक्ष जोडणाऱ्या नसेवर योग्य तो दबाव पडून गर्भाशयाशीनिगडित असलेल्या व प्रजनन क्षमतेवर प्रत्यक्ष प्रभाव टाकणाऱ्या अवयवांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.

Loading...

पायात जोडवी घातल्यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास व या दरम्यान ओटीपोटाचे, कमरेचे व पायांचे दुखणे कमी होण्यासही साहाय्य मिळते.

Loading...

पायामध्ये चांदीची जोडवी का घालावी याला धार्मिक आणि शास्त्रीय असे दोन्ही आधार आहे.धार्मिक आधारा बद्दल बोलायचे तर  सोन्याची जोडवी ही पायात घातली जात नाहीत कारण सोने हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे असे हिंदू धर्मात मानले जाते त्यामुळे लक्ष्मीदेवीला पायात धारण करणे हे अपमानास्पद आहे म्हणूनच पायात चांदीची जोडवी घातली जातात.

Loading...

पायामध्ये चांदीची जोडवी घातली जाण्या मागचं शास्त्रीय कारण म्हणजे चांदी मध्ये एक प्रकारची ध्रुवीय ऊर्जा पायापासून थेट गर्भाशया पर्यंत नेण्याची क्षमता असते. यामुळे गर्भाशयाच्या आजूबाजूचे अवयव, मूत्रपिंडाचे इत्यादी आरोग्य व रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत चालते.

Loading...

चांदीची जोडवी घातल्यामुळे स्त्रीची प्रजननक्षमता अधिक सुधारण्यास मदत होते व काहींच्या मते चांदीची जोडवी घातल्यामुळे काही प्रमाणात लैंगिक निरुत्साह कमी होण्यासही सहाय्य मिळते.

Loading...

भारतीय संस्कृतीमध्ये केवळ सौभाग्यवती स्त्रियांनी जोडवी घालावी असे सांगितले असले तरी काही अविवाहित स्त्रिया किंवा मुलीसुद्धा आजकाल पायामध्ये जोडवी घालत असल्याचे दिसून येते अविवाहित स्त्रिया किंवा मुलींनी अंगठ्या जवळच्या तिसऱ्या बोटात जोडवे घातले तर मासिक पाळीतील त्रास कमी होण्यास साहाय्य मिळू शकते.

Loading...