July 5, 2022

…म्हणून विराट कोहली आणि एमएस धोनी वापरत असलेल्या बॅटची किंमत आहे कोटीच्या घरात.

इंग्लंडमध्ये जन्मास आलेल्या क्रिकेट या खेळाने भारतासह जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली.नजीकच्या काही दशकांमध्ये क्रिकेटला आलेले मनोरंजनाचे स्वरुप आणि प्रसारमाध्यमांद्वारे केले गेलेले क्रिकेटचे उदात्तीकरण यांमुळे क्रिकेट या खेळासोबतच क्रिकेटमधील खेळाडूंनाही स्टारचे स्वरूप आले.

Loading...

आयपीएलसारख्या व्यावसायिक स्वरूपातील क्रिकेटमुळे क्रिकेटपटूंचे योगदान हे केवळ क्रिकेटच्या पीचपुरते मर्यादित न राहता निरनिराळ्या स्पाॅन्सररच्या जाहिरातींमध्येही दिसून येते.मैदानाच्या बाहेर जाहिरातींद्वारेआपल्या लोकप्रियतेने चाहत्यांना संबंधित उत्पादनांकडे आकर्षित करण्यासोबतच मैदानावरही क्रिकेटपटू आपली जर्सी, ग्लोव्हज, इतकेच नव्हे तर क्रिकेट बॅट यांवर निरनिराळ्या उत्पादनांचे लोगो लावून उत्पादनांची जाहिरात करतात.

Loading...

क्रिकेटपटूंचे फॅन्स खेळाडूंच्या महागड्या लाइफस्टाइलचे नेहमीच दिवाने असतात. यांपैकीच एक म्हणजे क्रिकेटपटूंच्या बॅटची किंमत. क्रिकेटपटूंच्या बॅटची किंमत ही ती बॅट कोणता क्रिकेटपटू वापरतो यावर अवलंबून असते.

Loading...

भारतीय क्रिकेटजगतातील आघाडीच्या व तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या क्रिकेटपटूंच्या बॅटच्या किंमती ऐकून नक्कीच चक्रावल्यासारखे होणार. बॅटची किंमत ही त्या बॅटसाठी किती वर्षे जुने लाकूड वापरले जाते यावर अवलंबून असते. सातडाचे वय मोजण्यासाठी ग्रेन हे परिमाण वापरले जाते. १ग्रेन = एक वर्ष.

Loading...

१. भारतीय क्रिकेटमध्ये आक्रमकतेचे नवीन पर्व सुरू करणा-या कर्णधार विराट कोहलीची तडाखेबाज बॅट सव्वा किलोची असून त्यावर एमआरएफचा लोगो आहे . याच बॅटची सर्वसाधारण किंमत २२००० असून एमआरएफचा लोगो लावण्यासाठी विराट तब्बल आठ कोटी रूपये आकारतो.

Loading...

२.तरूणाईसाठी स्टाइल आयकॅान असलेला महेंद्रसिंह धोनी वजनाने जड व जुन्या लाकडापासून बनवलेल्या बॅट वापरण्यावर भर देतो.त्याच्या बॅटवर sprtan या कंपनीचा लोगो दिसून येतो. त्याच्या बॅटची किंमत २०-२२हजारच्या घरात अ्सून. कंपनीचा लोगो लावण्यासाठी तो सहा कोटी इतके मानधन घेतो.

Loading...