May 23, 2022

मक्का व मदिना याठिकाणी शिवलिंगाचे अस्तित्वात आहे का?: जाणून घ्या संपूर्ण माहिती

आदिम काळापासून मनुष्य हा वास्तवाच्या पलीकडे जाऊन आंतरिक बळ देणाऱ्या एका श्रद्धेवर मोठ्या प्रमाणात जगत असतो. या श्रद्धेला समाज, राजकीय व्यवस्था आणि धार्मिक व्यवस्थेने धर्म ,जाती ,वर्ण इत्यादींचे स्वरूप दिले आहे. मानवी इतिहासापासून ते आत्तापर्यंत आधुनिक काळातही धर्म किंवा जातिव्यवस्थेच्या नावावर सामुदायिक श्रद्धा, भावना, प्रतीके इत्यादींना माध्यम बनवून दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याची समाजविघातक वृत्ती काही प्रमाणात  नेहमीच दिसून आली आहे.

Loading...

प्राचीन काळातील आख्यायिकांचा आधारे सध्या अस्तित्वात असलेल्या तीर्थक्षेत्रे किंवा धार्मिक पवित्र स्थानांवर दोन गटांनी आपला हक्क सांगून असंतोष निर्माण करण्याचीही उदाहरणे आपल्याला ज्ञात आहेत .इस्लाम धर्मातील पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजेच मक्का मदिना. हज यात्रेला जाणे हे कोणत्याही मुस्लिम बांधवासाठी आयुष्य सार्थकी लावण्यासारखे आहे. याच पवित्र मक्का मदीना मधील काबा याठिकाणी पुरातन काळात मक्केश्वर येथे शिवलिंग अस्तित्वात होते व आजही ज्या काबाची पवित्र म्हणून मुस्लिम बांधव चुंबन घेऊन पूजा करतात ते प्रत्यक्षात शिवलिंग आहे असे अनेक ठिकाणी वर्णन करण्यात आले आहे .मात्र या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे प्रत्यक्षात हज यात्रेला उपस्थित राहिलेल्या बांधवांनी सांगितले आहे. याच संदर्भात मक्का मदीना विषयी काही तथ्य आज आपण जाणून घेऊयात.

Loading...

1) सौदी अरेबियामध्ये इस्लाम धर्माचा उगम झाला व इथेच खऱ्या अर्थाने इस्लाम धर्माच्या प्रसाराची सुरुवात झाली .त्यामुळे मक्काआणि मदिना हे दोन पवित्र तीर्थक्षेत्र सौदी अरेबियाची खरी ओळख व शान आहे .प्रत्येक इस्लाम बांधव हा आयुष्यात एकदा तरी मक्का ,मदीना तीर्थक्षेत्राला जाऊन आपले सर्व पाप व पुण्य यांचा लेखाजोखा प्रेषिताकडे देण्याचे स्वप्न पाहत असतो. याच ठिकाणी हज यात्रा संपन्न होते व त्यासाठी जगभरातील कानाकोपऱ्यातून मुस्लीम बांधव एकत्र येऊन नमाज अदा करतात.

Loading...

2) मक्का मदीना ही दोन वेगवेगळी ठिकाणे आहेत.मक्का या  ठिकाणी पवित्र काबा असून मदिना याठिकाणी हजरत मोहम्मद पैगंबर यांचा दर्गा आहे .काबा याठिकाणी पवित्र दगड आहे त्याच्या आकारावरून काबा.असे नाव पडले आहे. या काबाकडे मख करून मुस्लिम बांधव पवित्र नमाजचे पठण करतात.काबा या ठिकाणी पूर्वी शिवलिंग होते असे काही ठिकाणी वर्णन करण्यात आले आहे .याला प्राचीन काळातील आख्यायिकांचे अधिष्ठान आहे. मात्र प्रत्यक्ष काबा या ठिकाणी जाऊन आलेल्या बांधवांनी या गोष्टींना साफ नाकारले आहे.इस्लाम धर्मामध्ये मूर्तिपूजेला विरोध करण्यात आलेला आहे. त्यामुळे काबामध्ये शिवलिंग असू शकत नाही असे प्रमाण देण्यात येते. इस्लाम धर्माच्या स्थापनेपूर्वी सौदी अरेबियातील अरब हे काही मोठ्या मूर्ती स्थापन करून त्याद्वारे इस्लाम धर्माचे पालन करत असत. मात्र इस्लाम धर्माच्या स्थापनेनंतर जवळपास चौदाशे वर्षांपासून काबाच्या आसपासच्या परिसरातील सर्व मूर्ती हटवल्या गेल्या व मशिदींमध्ये इस्लाम धर्माचे अर्थातच अल्लाचे पूजन केले जाते त्यामुळे काबामध्ये शिवलिंग असल्याचे दावे आपोआपच खोडले जातात.

Loading...

3) इस्लाम धर्माप्रमाणे काब अर्थातच काला पत्थर अल्लाच्या हुकूमानुसार   एका देवदूताने याठिकाणी आणला व तो ज्यावेळी आणला त्यावेळी त्याचा रंग हा सफेद होता. हजरत इब्राहिम यांनी काबाच्या बांधकामाच्या वेळी तो इमारतीच्या बांधकामामध्ये रोवला. अल्लाहच्या हुकुमानुसारच इस्लाम बांधव हा काला पत्थर  देवदूताने अर्थातच अल्लाहने पाठवला असल्यामुळे त्याचे चुंबन घेऊन त्याला हाताने स्पर्श करतात. त्यामागे कारण असे दिले जाते की काबाला स्पर्श करून इस्लाम बांधव आपल्या सर्व अपराध व पापांना हस्तांतरित करतात व यामुळे मुळात पांढरा असलेल्या या दगडाचे रूपांतर कालापत्थर मध्ये म्हणजेच काळ्या रंगामध्येझाले आहे.

Loading...

4) इस्लाम धर्मामध्ये एकेश्वरवाद मांडला जातो म्हणूनच संपूर्ण जगाचा निर्माता हा अल्ला असून नमाज पठन करतेवेळी जगभरातील सर्व इस्लाम बांधव एकाच वेळी एकाच दिशेकडे तोंड करून नमाज पढतात.

Loading...

 5) काबामध्ये शिवलिंग असल्याच्या दाव्यांच्या मागे एक अख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार रावण हा भगवान शिवाचा खूप मोठा भक्त होता. त्याने भगवान शिवांना लंकेमध्येच कायमचे येऊन वास्तव्य करण्यास सांगितले. यावर भगवान शिवांनी.त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन त्याला एक अट घातली की हिमालयापासून लंकेपर्यंत शिवलिंग घेऊन जात असताना ते कोठेही न थांबता लंकेपर्यंत नेले.तरच भगवान शिव कायमचे लंकेमध्ये वास्तव्य करतील.मात्र या अटीची पूर्तता करण्यात रावण कमी पडला व मकेश्वर याठिकाणी ते लिंग त्याच्याकडून ठेवण्यात आले .या आख्यायिका आधारावरच मक्केमध्ये काबा अर्थातच शिवलिंग अस्तित्वात आहे असे मानले जाते. मात्र सध्याच्या काळात याला पुष्टी देणारे असे प्रमाण नाही.

Loading...

6) मक्का मदीना येथे जाण्यासाठी जेद्दाह हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे .या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ असून याठिकाणी मक्का व मदिनेला इस्लामधर्मीय व्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश नसल्याचे बोर्ड दिसून येतात. मक्का व मदिना या ठिकाणी इस्लाम धर्म व्यतिरिक्त अन्य धर्मियांना प्रवेश नसल्यामुळे काबा याठिकाणी शिवलींग असल्याच्या दाव्यांना वादातीत मानले जाते.

Loading...