January 18, 2022

बेरोजगार असाल तर हे नक्की वाचा…!

आंतराष्ट्रीय वर्तुळात देशाचे सत्तास्थान हे त्या राष्ट्राची अर्थव्यवस्था किंवा आर्थिक पत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन आयामांचे लावलेले शोध आणि संरक्षणव्यवस्था या निकषांच्या आधारे साधारणपणे निर्धारीत केले जाते.या सर्व निकषांना मूल्याधारीत अधिष्ठान देणारा कणा असतो त्या देशाचे मनुष्यबळ किंवा बौद्धिक संपत्ती .विकासाच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी केवळ संख्यात्मकरीत्या जास्त मनुष्यबळ असण्यापेक्षा कुशल मनुष्यबळाचा परिपूर्ण व योग्य वापर करून घेणे आवश्यक असते.

Loading...

देशातील मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात बेरोजगारीच्या स्वरूपात निष्क्रीय असणे हे निश्चितच राष्ट्र व व्यक्ती या दोन्हींच्या दृष्टीने हितावह नाही.भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राष्ट्रांपैकी एक असलेल्या व विकसनशील राष्ट्रांमध्ये गणल्या जाणार्या भारताप्रमाणेच विकसित ,प्रगत राष्ट्रांवरही बेरोजगारीची टांगती तलवार असते.

Loading...

बेरोजगारीच्या समस्येच्या प्रमुख कारणांपैकी काही कारणे म्हणजे जागतिक मंदी, मागणी व पुरवठा व्यवस्थेतील असमतोल इ.या सर्व कारणांमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीमुळे केवळ आर्थिकच नव्हे तर दूरगामी सामाजिक ,राजकीय आणि मानसिक परिणाम झाल्याचे दिसून येते.

Loading...

बेरोजगारीमुळे व्यक्तिश: आर्थिक नुकसान होण्यासोबतच सततच्या तणावामुळे नैराश्य व वैफल्याची भावना निर्माण होते.बेरोजगारीच्या दुष्टचक्राला भेदण्यासाठी त्यामध्ये अडकून न राहता बेरोजगार व्यक्तीने स्वत:ला कशाप्रकारे वेळेचा सदुपयोग करत व्यस्त ठेवले पाहिजे हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

Loading...

सध्या अस्तित्वात असलेली शिक्षणव्यवस्था ही रोजगारधिष्ठीत नसल्याची टीका अनेकदा केली जाते.त्यामुळे प्रत्यक्षात नोकरी शोधतेवेळी पुस्तकी ज्ञानाचा बर्याचदा उपयोग होत नाही म्हणून नोकरी मिळवण्यात अपयश आले की सर्वप्रथम तटस्थपणे स्वत:चे परिक्षण केले पाहिजे.

Loading...

आपल्या क्षेत्रातील कोणत्या कौशल्यांचा अंगीकार आपण केला पाहिजे ते इंटरनेट किंवा पुस्तकांच्यी वाचनातून जाणून घेता येऊ शकते.शक्य असेल तर आपल्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शनही घेतले जाऊ शकते. नोकरी नसल्यामुळे हातात असलेला मोकळा वेळ काही तांत्रिक कौशल्य शिकण्यासाठी वापरला जाऊ शकतो. आपल्या क्षेत्रात होणारे बदल,गरजा यांबद्दलचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी निरनिराळी पुस्तके,मासिके यांचे वाचन करणे हे भविष्यातील मुलाखतींसाठी निश्चितच फायद्याचे आहे.

Loading...

वाचनासोबतच माहितपट बघणेही ज्ञानात भर घालण्याचा व वेळ सत्कारणी लावण्याचा उत्तम मार्ग आहे.आपल्याकडे नोकरी नाही म्हणून स्वत:विषयी न्यूनगंड निर्माण करून न घेता सातत्याने नोकरीचा शोध घेतला पाहिजे.नोकरीच्या निवडप्रक्रियेची सखोल अभ्यास केला पाहिजे.जेणेकरून ऐनवेळी मिलाखतीला सामोरे जावे लागले तरी आपल्यामधे आत्मविश्वास निर्माण झालेला असतो.

Loading...

आपल्या बाबत उद्भवलेल्या बेरोजगारीचे खापर सरकारी यंत्रणांची उदासीनता, भ्रष्टाचार, निवडप्रक्रियेतील फेरफार किंवा नशिबावर न फोडता आपण कोठे कमी पडत आहोत याचा सारासार विचार करावा. काही वेळेस जागतिक स्तरावरील घडामोडींच्या पडसादाच्या स्वरूपात बेरोजगारीची स्थिती निर्माण होते.

Loading...

अशावेळी आपण परिस्थिती बदलू शकत नाही या भावनेतून आळस अंगीकारता कामा नये. निरनिराळे छंद जोपासले पाहिजे.आळस झटकून टाकण्यासाठी व ताणतणाव नाहीसा करण्यासाठी व्यायाम केला पाहिजे.नोकरी नसल्यामुळे रिकाम्या वेळात नकारात्मक विचारांची गर्दी. होऊ देणे कटाक्षाने टाळावे. बेर. बेरोजगारीमुळे येणा-या सामाजिक दडपणाला बळी पडऊन आत्ममग्न होण्यापेक्षा मित्रमैत्रिणींमध्ये मिसळावे.

Loading...

बेरोजगारी म्हणजे संधींचा अंत नाही हे मनाशी पक्के. ठरवून रिकाम्या वेळेचा सदुपयोग भविष्यासाठी करणे हा सुवर्णमध्य ठरू शकतो.

Loading...