February 17, 2020

जाणून घेऊया गणिताच्या पाढ्यांविषयी

Read Time0 Second

बे एके बे ,बे दुने चार असे म्हणताच  प्रत्येकाला आपल्या बालपणीच्या शाळेतील गणिताचा तास आठवतो आणि भोलानाथला गणिताच्या पेपरच्या दिवशी ढोपर दुखण्याची विनंती केल्याचेही आठवते. अशी गणिताच्या पाढे आणि समिकरणांची भीती ज्या देशामध्ये महान गणितज्ञ होऊन गेले अशा भारतातील विद्यार्थ्यांना आजही वाटते.कोणतेही गणित सोडवण्यासाठी काही प्राथमिक गणितीय संकल्पनांचे ज्ञान असणे आवश्यक ठरते.

Loading...
Loading...

यापैकीच एक म्हणजे गणितातील पाढे पाठ करणे  भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये मराठी व अन्य माध्यमांमध्येही गणितातील पाढे पाठ करण्यावर जोर दिला जातो . प्राथमिक शिक्षण स्तरावरच गणितातील पाढे पाठ करून घेतले जातात. पाढे पाठ करणे हे मूलतः स्मरणशक्तीवर आधारित आहे .पाढे पाठ करण्यासाठी मुळातच या पाढ्यांची रचनाही ताल व लयपूर्ण पद्धतीने केली आहे .

Loading...

ज्यामुळे लहान मुलांच्या आकलनशक्‍तीला सुसंगत ठरते व ते सहजपणे पाढे पाठ करू शकतात.आपण जर मराठी माध्यमातील शिक्षणाविषयी जाणून घ्यायला लागलो तर मराठी मध्ये त्र्याण्णव ,शहाण्णव अशाप्रकारे म्हटले  जाते.नव्वद आणि तीन असे न म्हणता एक स्वतंत्र शब्द हा अंक शब्द त्या अंकासाठी दिलेला असतो. ज्यामुळे मुलांना सहजपणे ते पाढे पाठ होतात. इंग्रजी माध्यमातील शिक्षणाविषयी विचार केला तर त्या ठिकाणी अंकासाठी एक स्वतंत्र शब्द दिला जात नाही तर नाईंटी थ्री असे शब्द दिले जातात. त्यामुळे त्या मुलांना त्यामुळे इंग्रजी भाषेतील पाढ्यांना टेबल्स म्हणजेच पाढे पाठ करताना एक लय किंवा ताल निर्माण होणे चे प्रमाण हे मराठी माध्यमातील पाढ्यांपेक्षा थोडे कमी असते.

Loading...

पाढे पाठ करताना संपूर्ण वर्ग जेव्हा एकत्रितपणे लयबद्ध पणे पाढे पाठ करत असतो तेव्हा आपोआपच स्मरणशक्ती व आकलनशक्ती वाढून ते पाढे कायमचे स्मरणात राहतात असे शिक्षणविषयक सर्वेक्षणांमध्ये आढळून आले आहे.

Loading...

पाढे पाठ करण्यासाठी व ते कायम लक्षात राहण्यासाठी नियमित सराव व उजळणी करणे आवश्यक ठरते.

Loading...
Loading...

पूर्वी गणिताचे पाढे पाठ करण्यासाठी उजळणी किंवा चार्ट पेपर मिळायचे आता  सध्या ऑनलाइन एप्लीकेशन द्वारे गणितातील पाढे पाठ करण्याचे प्रशिक्षणही मुलांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Loading...
0 0

About Post Author

Tomne

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Loading...
Loading...