July 5, 2022

उत्तम आरोग्यासाठी दररोज किती तासांची झोप आवश्यक असते? आणि ती मिळवण्यासाठी काय कराल?

आज आपण बघणार आहोत साधारणतः किती झोप आपल्याला आवश्यक असते . आपली रात्रीची झोप ही  मुख्यतः ४ भागात विभागलेली असते 

Loading...

१) स्थिती १ : जेव्हा आपल्याला सर्वप्रथम झोप लागते किंवा ज्याला डोळा लागणं  असं आपण म्हणतो ती असते झोपेची प्रथमावस्था . या अवस्थेत आपण झोपेतून पटकन जागे होतो आणि परत झोपतो देखील . ही  अवस्था काही मिनिटांची असते आणि यात आपली डोळ्यांची हालचाल , हृदयाची स्थिती , श्वासाचा  वेग हे सर्व मंदावलेलं  असतं. आपल्या मांसपेशी रिलॅक्स होऊन मेंदूच्या जागृत भागातील उत्तेजना कमी व्हायला लागलेल्या असतात. 

Loading...

२) स्थिती २ : ही  गाढ निद्रावस्थेच्या अगोदरची स्थिती असून या स्थितीत डोळ्यांची हालचाल , मांसपेशींची हालचाल थांबलेली असते. शरीराचं  तापमान हळूहळू कमी होऊ लागलेलं असतं आणि मेंदू देखील सैलावायला लागलेला असतो. 

Loading...

३) स्थिती  ३ : ही गाढ निद्रावस्थेची स्थिती आहे या प्रकारच्या झोपेमुळेच आपल्याला सकाळी ताजतवानं वाटतं  . कारण या अवस्थेअंतर्गत आपलं हृदय , मांसपेशी, मेंदू हे सर्व आराम करत असतात आणि म्हणूनच या अवस्थेत एखाद्याला उठवणं कठीण होऊ शकतं . 

Loading...

४)स्थिती  ४ : शेवटच्या स्थितीला “REM ” म्हटलं जातं  , ही  झोपेची स्थिती साधारण पहाटेच्या वेळी येते आणि याच कालावधीत आपल्याला maximum स्वप्ने पडतात. यावेळेस मात्र बाकी निद्रावस्थांच्या  विपरीत होत असतं म्हणजेच डोळे बंद असूनही वेगाने त्यांची उघडझाप होत असते , ब्रेन activity  वाढलेली असते , रक्तदाब वाढलेला असून , श्वासाचा दर अनियमित झालेला असतो . आणि हात आणि पायाच्या मांसपेशी मात्र या कालवधीपुरत्याच काम करणं  बंद झालेल्या असतात . 

Loading...

एकूण ४ स्थितींमधून जाणारी झोप ही  प्रत्येकासाठी किती असावी हे मात्र प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून आहे त्याचबरोबर तुम्ही वयाच्या ज्या टप्प्यावर आहेत त्यावर पण अवलंबून आहे उदाहरणार्थ लहानमुले  साधारणतः १९ तास झोपू शकतात तर ३-१३ वयोगटासाठी हा आकडा ७ ते ११ तास इथवर येऊन थांबतो . तर २५ पर्यंत हा आकडा ६ ते १० या कक्षेत फिरू शकतो . २५ च्या वर आणि ६०च्या आत असाल तर ७/८ तास झोप तुम्हाला ताजेतवाने करू शकते पण ६० नंतर मात्र झोप हळूहळू कमी होऊ लागते . 

Loading...

पण तुम्ही २५च्या वर आहेत पण ५०च्या आत आणि ६ तासांवर झोप घेतल्यास तुम्हाला ताजतवानं  वाटण्याऐवजी थकवा येत असेल तर ते अनेक गंभीर रोग अथवा “मेटॅबॉलिक सिन्ड्रोम ” नावाच्या रोगाचं  लक्षण असू शकतं . आणि अशी स्थिती बरेच दिवस राहिल्यास डॉक्टरांशी लवकरात लवकर संपर्क साधने इष्ट ठरते . 

Loading...

तळटीप : ( हा लेख तुमच्या माहिती साठी लिहिलेला असून त्याला वैद्यकीय निदान समजू नये )

Loading...