मायाजाल ,मोहमयी दुनिया असे वर्णन केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटक्षेत्रामध्ये आपला जम बसवण्यासाठी हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी या मायाजाला मध्ये प्रवेश करतात.जितक्या वेगाने यशाची शिडी बॉलिवूडमध्ये चढणे सोपे वाटते तितक्याच सहजतेने ते यश टिकवून ठेवणे नक्कीच शक्य होत नाही. यश मिळवण्यापेक्षा यशाचा आलेख उंचावत नेणे हेच सगळ्यात मोठे आव्हान असते. आतापर्यंतच्या अनेक उदाहरणावरून दिसून आले आहे की हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अशा अनेक तारका आजपर्यंत होऊन गेल्या आहेत ज्यांना पहिल्या चित्रपटांमध्ये अमाप यश प्रसिद्धी व पैसा मिळाला मात्र पहिल्या चित्रपटानंतर या गर्दीमध्ये कुठेतरी हरवून गेल्या किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांनी दुसरा मार्ग पत्करला. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच काही अभिनेत्री विषयी ज्या पहिल्या चित्रपटानंतर फारशा चित्रपटांमध्ये दिसून आल्या नाहीतः
1. मंदाकिनी-राम तेरी गंगा मैली या चित्रपटाद्वारे पदार्पण केलेल्या मंदाकिनी या अभिनेत्रीने संपूर्ण देशभरात आपल्या अभिनय व अंग प्रदर्शनाने प्रचंड लोकप्रियता मिळवली.मात्र त्यानंतर कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्राहिम सोबत असलेल्या तथाकथित प्रेम प्रकरणानंतर तिने भारतातून स्थलांतर केले व बॉलिवूडमधील तिचा अभिनय प्रवास तिथेच संपुष्टात आला.
2. महिमा चौधरी- परदेस या पहिल्यावहिल्या चित्रपटामध्ये बिग बँनरसोबत काम करून गावाकडच्या एका साध्यासुध्या मुलीच्या भूमिकेतील गंगा ही संपूर्ण स्तरातील प्रेक्षकवर्गाला प्रचंड भावली. मात्र त्यानंतर महिमा ला म्हणावे तितके यश मिळाले नाही .आता तर ती सिनेसृष्टीतून जणू गायब झाली आहे।
3. मधु -फुल और काँटे ,रोजा यांसारख्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटानंतर चित्रपट सृष्टी मध्ये मधूच्या नावाचा गाजावाजा होत होता. तिच्या वाट्याला चांगले रोलही येत होते. बराच काळ चित्रपट सृष्टीमध्ये आपले वर्चस्व कायम राखू शकत होती मात्र विवाह करून कौटुंबिक आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. सध्या तिचे दर्शन हे पेज थ्री बातम्यांमध्ये घडून येते.
4. गायत्र जोशी -शाहरुख खानच्या प्रेमीकेची भूमिका केलेल्या स्वदेस मधील गायत्री जोशी ला एक नवीन फ्रेश चेहरा म्हणून पाहिले जात होते मात्र स्वदेस. रिलीज झाल्यानंतर लगेचच गायत्रीने लग्न केले व आता आपले कुटुंब आणि मुलांच्या संगोपनाकडे ती जास्त लक्ष देते.काही सामाजिक उपक्रमांमध्ये ती नेहमीच हजेरी लावत असल्याचेही दिसून येते.
5. भाग्यश्री- मैने प्यार किया या आजही सुपरहिट असलेल्या प्रेमपटाद्वारे चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलेल्या सुंदर व अभिनयाच्या बाबतीत हिरा मानलेल्या भाग्यश्रीला उद्याची सुपरस्टार म्हणून ओळखले जाऊ लागले होते .मात्र त्यानंतर लगेचच भाग्यश्री विवाह बंधनात अडकली व निर्माता आणि दिग्दर्शक यांना केवळ आपल्या पतीसोबत अभिनय करण्याची अट तिने घातली होती. त्यामुळे तिचे करिअर संपुष्टात आले. सध्या ती फिटनेस दिवा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे.
6. सोनम- ओए ओए गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली सोनम तिच्या सौंदर्य व घोगऱ्या आवाजामुळे प्रसिद्ध होती.राजीव राय यांच्याशी लग्न केल्यानंतर अंडरवर्ल्डकडून येत असलेल्या खंडणीच्या धक्क्यामुळे राजीव राय व सोनम यांनी भारत सोडला.
7. ग्रेसी सिंग- लगान सारख्या एका अविस्मरणीय कलाकृती द्वारे पदार्पण करण्याची संधी मिळालेल्या ग्रेसीने त्यानंतर मुन्नाभाई एमबीबीएस या सुपरहिट चित्रपटातही काम केले .मात्र त्यानंतर सध्या ग्रेसी.चित्रपटसृष्टीतून जणूकाही गायबच झाली आहे.
8. अनु अग्रवाल- आशिकी या चित्रपटाद्वारे पदार्पण करणारी ,सावळ्या कांतीची काहीशी वेगळीच प्रतिमा घेऊन आलेली ही अभिनेत्री रातोरात सुपरस्टार झाली .या चित्रपटातील गाणी ही प्रेक्षकांच्या ओठांवर आजही रुळलेली आहेत.त्यानंतर खलनायिका व अन्य काही चित्रपटांमध्येही अनुने काम केले.मात्र तिचे दुर्दैव असे की एका अत्यंत जीवघेण्या अपघाता मधून ती बचावली. मात्र त्यानंतर तिने चित्रपट सृष्टी मधून कायमचा संन्यास घेतला. सध्या बिहारमधील एका प्रसिद्ध योगा इन्स्टिट्यूटमध्ये योगाचे प्रशिक्षण देण्याचे काम ती करते.
9. मुग्धा चिटणीस -1986साली माझं घर माझा संसार हा अजिंक्य देव आणि मुग्धा चिटणीस यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता व आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने हाचित्रपट बघतात .या चित्रपटातील गाणीही त्यावेळी खूप गाजली होती .या चित्रपटानंतर लगेच मुग्धा आपल्या पतीसोबत अमेरिकेत स्थायिक झाली। मात्र अगदी अल्पवयात त्यांना कॅन्सरने विळखा घातला व त्यातच त्यांचा अंत झाला. मात्र आजही मुग्धा यांचा चित्रपटातील अभिनय प्रेक्षक विसरु शकलेले नाहीत.